मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानाअंतर्गत गंगापूर शहर भूमिगत गटार योजना प्रगतीपथावर आहे. ही योजना कार्यान्वित होण्यासाठी पाईप जोडणीसह चेंबर बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र एसटीपीच्या कामास स्थानिक नागरिक विरोध करीत असल्याने हे काम सुरळीत होण्यासाठी समन्वयाने जागा शोधून काढावी व तातडीने प्रकल्प पूर्ण करण्यात यावा, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार संतोष माने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, जल जीवन अभियनाचे संचालक, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबादच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री.बनसोडे म्हणाले की, एसटीपी आणि सिव्हर लाईनचे काम सध्या सुरु नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. येथील मुख्य अभियंता यांनी याबाबत पाठपुरावा करावा.
मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत जायकवाडी धरण क्षेत्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर या तालुक्यांना जायकवाडी धरणातून ग्रीड प्रस्तावित करण्यात आला आहे. पाण्याची उपलब्धता पाहून याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचनाही श्री. बनसोडे यांनी यावेळी दिल्या.
गंगापूर वॉटर ग्रीड योजना
गंगापूर वॉटर ग्रीड योजनेच्या संदर्भात गंगापूर तालुक्याचा संपूर्ण वॉटर ग्रीडचा प्रस्ताव पीएमसी एजन्सीकडून तयार करुन तो जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तयार करणे व मंजुरीसाठी पाठविणे.
गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान योजनेचा आढावा
मागील आठवड्यातच पी एम सी एजन्सीची निवड करण्यात आलेली आहे. खुलताबाद तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीतील पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करुन त्यांचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. गंगापूर तालुक्यातील ज्या योजना वॉटर ग्रीड योजनेत बसणार नाहीत त्या सर्व पीएमसी एजन्सी कडे प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी ठेवण्यात येतील.
जिल्हा परिषद औरंगाबाद येथील विविध योजनांवर असलेले पंप ऑपरेटर यांना शासनाकडून पगार देणेबाबत
सध्या महाराष्ट्रामध्ये चार जिल्हा परिषदांना पगारासाठी निधी देण्यात येत आहे. त्याचआधारे औरंगाबाद जिल्हा परिषद यांचादेखील प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करावा.
गंगापूर नगरपरिषद अंतर्गत सुरु असलेल्या मलनि:स्सारण योजनेच्या प्रगती व तक्रारीबाबत आढावा घेणे
शासन निर्णयाप्रमाणे प्रथम एसटीपी प्लांट बांधण्यात यावा नंतर उर्वरित भूमिगत गटार बांधण्यात यावी, लवकरात लवकर एसटीपी प्लांटसाठी योग्य ती जागा शोधून काम प्रगतिपथावर करावे, अशी सूचना राज्यमंत्री श्री.बनसोडे यांनी केली.
0000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3EFWsvi
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment