मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी, 'व्यासपीठावरील आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी...', असं विधान केल्यानं पुन्हा एकदा भाजप- शिवसेना युतीच्या चर्चांनी जोर धरला असतानाच संजय राऊत यांनी आणखी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. कुणीतरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. त्यामुळं भाजपमधील कोणते नेते महाविकास आघाडीत (Maha vikas aghadi) प्रवेश करणार, असे तर्क- वितर्क लढवले जात आहेत
संजय राऊतांनी आज प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. 'मुख्यमंत्र्यांनी मराठावाड्यातील कार्यक्रमात जे वक्तव्य केले आहेत ते ठाकरे शैलीत केलं आहे. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी युती होईल अंस कोणतीही वक्तव्य केलं नाही. ज्यांना भावी सहकारी व्हायचं आहे ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत, असे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. राजकारणात ज्या हालचाली दिसतायात विषेशतः चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाबाबात त्या हालचाली आहेत. कोणी तरी आहे तिथे त्यांना इथे यायचंय त्यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी संकेत दिले आहे,' असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
'हे सरकार पूर्णपणे पाच वर्ष चालणार आहे. शिवसेनेनं कधी विश्वासघात केला नाही आणि करणारही नाही. शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही ही शिवसेनेची खासियात आहे. सरकार पडेल या भ्रमात राहू नये. कोणाला जर पंतग उडवायचे असतील त्यांनी ते पंतग उडवत बसावे, तो पतंग कसा कापायचा हे आम्हाला माहितीये,' असा इशाराही यावेळी संजय राऊतांनी दिला.
'ज्या पक्षातल्या लोकांनी शिवसेना भवन तोडण्याची भाषा करतात, ज्या पक्षातील लोकं मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरतात. अशा पक्षाशी हातमिळवणी कशी करु शकतो असं सांगतानाच त्यांनी युतीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय कोणीतरी इथे येतेय त्यांचे आम्ही स्वागत करु,' असा पुर्नउच्चारदेखील त्यांनी केला आहे.
वाचाः
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
'राजकारणात राजकीय मतभेद असतात. आम्ही एकमेकांवर टीका करतो याचा अर्थ आम्ही कडवट दुष्मन असतो असं नाही.रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार एकत्र बसल्याने अडचण वाटण्याचं कारण नाही. ते दोघेही त्या भागातील मंत्री आहेत. दानवे आणि आम्हीही सोबत बसतो. राजकारणात कडवटपणा नसतो. उद्या फडणवीस भेटले तर त्यांच्याशी मी नक्कीच बोलेन. त्यांची ख्याली खुशाली विचारेन. उद्या मला त्यांच्या घरी जावंसं वाटलं तर मी त्यांच्याकडे जाईन. एकमेकांचं तोंडच पाहायचं नाही, एकमेकांशी बोलायचंच नाही, असं महाराष्ट्रातील राजकारण नाही. हे चालत नाही महाराष्ट्रात. महाराष्ट्राला एक परंपरा आहे,' असंही त्यांनी म्हटलं आहे.
विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/ पत्नी / पाल्य यांना विशेष गौरव पुरस्काराबाबत आवाहन
No comments:
Post a Comment