डोंबिवली येथे १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आल्यानंतर त्याचे राजकीय कनेक्शन उघड होत आहे. या प्रकरणातील बहुतांश संशयित हे राजकीय नेत्यांचे नातेवाईक आहेत. यात सर्वपक्षीय नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी डोंबिवलीतील १५ वर्षांच्या मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी नऊ महिन्यांच्या काळात आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. मुलीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी २३ आरोपींना अटक केली. यातील दोघे अल्पवयीन आहेत.
संबधित मुलीच्या प्रियकराने तिला फसवून तिच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना घडवून आणल्याचे समोर येत आहे. एका मित्राचा वाढदिवस आहे, त्याच्या पार्टीसाठी ये, असे सांगून तिला अज्ञात ठिकाणी नेले. तेथे तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. या प्रकाराचा व्हिडिओ काढला. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर अनेकदा बलात्कार केला, त्याचेही चित्रीकरण करून नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
पीडित मुलगी डोंबिवलीच्या ग्रामीण भागात राहते. जानेवारीत तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवीत बलात्कार केला होता. त्यावेळी काढलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकर आणि त्याच्या ३३ मित्रांनी तिच्यावर ठिकठिकाणी आळीपाळीने बलात्कार केला. २९ जानेवारी ते २२ सप्टेंबर या काळात या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. संबधित तरुणांनी डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड येथे नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणातील अद्याप १० जण पसार असून अन्य काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे.
डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणातील संबधित तरुणीला कळवा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.
बलात्कार प्रकरणातील सर्वांवर मानपाडा पोलिस ठाणे येथे ३७६, ३७६ (एन), ३७६ (३), ३७६ (ड) (अ) सह पोक्सोअंतर्गत कलम ४.६.१० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी अटक झाल्याची माहिती मिळताच शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते आणि राजकीय पुढाऱ्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यास भेट देऊन या दबावतंत्राची चुणूक दाखवली. भाजपच्या नगरसेविकेने तर पोलीस ठाण्यात फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची तक्रार गोव्यातून हडपसर पोलिसांकडे
खासदार प्रिन्स पासवान यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
राजकीय पदाधिकाऱ्यांची पोलिस स्टेशनला हजेरी
बलात्कार प्रकरणात अटक होताच मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात हजेरी लावली. मात्र, तेथे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याने अनेकजण माघारी परतले. यातील बहुतांश आरोपींचे पालक हे राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबधित आहेत.
No comments:
Post a Comment