गंगापूर (लातूर) दि. २३ सप्टें रोजी पीसीआरए यांच्या वतीने नि:शुल्क डोमेस्टिक वर्कशॉप आयोजित करण्यात आले, गंगापूर ग्रामीण परिसरातील महिलांचा सर्वाधिक सहभाग होता. इंधन बचतीसाठी केदार खमितकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. बालाजी गाडेकर गंगापूर यांची मुख्य उपस्थिती होती. सर्वसामान्यांसाठी प्रश्न असतो तो मासिक जमा खर्चात वीजेचे बिल कसे कमी करता येईल यासाठी घरातील दिवे घरगुती उपकरणे यावर कमीत कमी खर्च होईल हे पाहिले जाते. घरगुती वापराच्या विद्युत उपकरणांवर मोठ्या प्रमाणात वीजेचा वापर होतो. दैनंदिन वापरांमध्ये वीज बचतीचे लहान लहान उपाय करता येतात. उदा. टीव्ही सेटस, सेट टॉप बॉक्स, कम्प्युटर्स, चार्जर्स हे स्टॅण्ड बाय मोडावर ठेवू नयेत याबाबत केलेल्या सर्वेक्षणात लाखो युनिटस वाया जातात हे पुढे आले असल्याचे पीसीआरए चे व्याख्याता केदार खमितकर यांनी या वेळी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून सांगितले. पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ यांच्या जागरूकता फिल्म कार्यक्रमात दाखविण्यात आली. 'घरगुती गॅसचा अतिरिक्त वापर टाळा, इंधन वाचवा आणि बचत वाढवा' असा संदेश यावेळी देण्यात आला. पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय इंधन बचत मोहिम औद्योगिक, वाहतूक, कृषी आणि घरगुती क्षेत्रात प्रभावी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आणि समारोप इंधन संवर्धन प्रतिज्ञेने करण्यात आला. 'ईधन सरंक्षण जिम्मेवारी जन-जन की भागीदारी' विषयाचे जनजागृती सन्देश पत्रक परिसरात अनावरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment