मुंबई: मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाने मुंबई हादरली असून या प्रकरणी स्वत: मुख्यमंत्री यांनी लक्ष घातले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीला आणि मुंबईच्या पोलिस आयुक्तांशीही या प्रकरणाबाबत चर्चा केली.
साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला करोठारतील कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडित कुटुंबाला दिले आहेत. महिलेवर बलात्कार होऊन त्यात तिचा मृत्यू होणे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य आहे. या प्रकरणाबाबत मी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी बोललो असून हा खटला फास्ट्रट्रॅक कोर्टात चालवला जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर ते मुंबईच्या पोलिस आयुक्तांशी बोलले. पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा या दृष्टीने हालचाली करण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.
आरोपीला १० दिवसांची पोलिस कोठडी
दरम्यान, साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपी मोहन चौहान याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
No comments:
Post a Comment