मुरूड प्रतिनिधी :- ग्रामीण रुग्णालय मुरूड येथे डेंग्यू किट उपलब्ध करावे व सी बी सी मिशन चालू करावे. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण रुग्णालयात मुरूड येथे गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यू तपासणी किट उपलब्ध नाहीत. त्यामुळे पेशंटला बाहेरून तपासणी करून घ्यावी लागते. तसेच सी बी सी मशिन गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. रूग्णांना सी बी सी ही बाहेरूण करून घ्यावी लागत आहे. यामुळे नागरिकांना याचा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच प्रायवेट लॅब नागरिकांची प्रचंड प्रमाणात लूट करत आहेत.
अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे .या निवेदनावर भाजपा कार्यकर्ता विशाल कणसे याची स्वाक्षरी आहे.
No comments:
Post a Comment