मुरूड येथे कोविड 19 प्रतिबंधक लस मुबलक प्रमाणात उपलब्ध ; वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुनिता पाटिल
नोंदणी करून ऑनदस्पॉट लस दिली जाईल
मुरुड (श्रीकांत टिळक) : - कोरोणाचा प्रतिकार करण्यासाठी मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड 19 प्रतिबंधक लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असून लस घेण्याचे आव्हान येथील जनतेस वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनिता पाटील यांनी केले आहे.
डॉ.पाटील मॅडम म्हणाल्या की, कोरोनाच्या तिसरी लाट वर्तवण्यात आली असुन सामना करण्यासाठी जनतेने तोंडाला मास्क वापरणे, गर्दीत जाणे टाळणे, तसेच हात सॅनिटायझरने स्वच्छ धुणे या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच covid-19 चा प्रतिकार करण्यासाठी लसीकरण करणे योग्य ठरेल तसेच अठरा वर्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रत्येक नागरिकानी आपले दोन्ही डोस पुर्ण करून घ्यावेत व ग्रामीण रुग्णालय मुरूड येथे येऊन लस घ्यावी.
लस घेण्यासाठी सोबत आधार कार्ड व मोबाईल नंबर असावे .तसेच पहीली व दुसरी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असून त्यांनी ती घ्यावा . ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्याणी आपले प्रमाणपत्र ऑनलाईन घ्यावेत,आणि कोविड-19 विरोधी लढ्यात सहभागी होऊन सहकार्य करावे असे आव्हान वैद्यकीय अधिक्षक डाॅ.सुनिता पाटील मॅडम यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment