मुरुड ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात! - ग्रा.पं सदस्य वैभव सापसोड - latur saptrang

Breaking

Thursday, September 9, 2021

मुरुड ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात! - ग्रा.पं सदस्य वैभव सापसोड





मुरुड प्रतिनिधी : - मुरूड येथील ग्रामपंचायतीने गावातील नाल्या साफ न केल्यामुळे नाल्यातील गाळ रस्त्यावर आले आहे, यामुळे येथील परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. वेळीच ग्रामपंचायतीने ठोस पावले उचलून गावातील सर्व गटारी साफ कराव्यात तसेच गावातील बऱ्याच वीज खांबावरील पथदिवे बंद असल्यामुळे अंधार  झाला आहे . चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. असे  निवेदनाद्वारे ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात विस्तृत असे म्हटले आहे की, येथील ग्रामस्थ कोविड १९ या महाभयंकर आजाराला तोंड देत आहे, त्यातच पावसाळी वातावरणाने डासाची उत्पत्ती वाढून डेंगू, मलेरिया, टाईफाइड या सारख्या आजाराने थैमान घातले आहे. या साथीच्या आजाराने लहान मुले आजारी पडत आहेत. शासनाने कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असल्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुरुड ग्रामपंचायतीने नाल्यातील गाळ न काढल्यामुळे दूषित गाळ रस्त्यावर वहात आहे, परिणामी डासाचे प्रमाण वाढलेले आहे तसेच ठिकठिकाणी साचलेला कचरा वेळोवेळी उचलला नसल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे, याकरिता साठलेला कचरा वेळोवेळी उचलणे गरजेचे आहे, तसेच गावातील रस्त्यावरील खड्डे बुजवणे देखील महत्त्वाचे आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने नागरी समस्याकडे डोळेझाक करून अतिशय बेजबाबदार वागणे बरे नसून ग्रामस्थाच्या जीवाशी खेळत आहे. मागील अनेक मासिक बैठकीमध्ये आम्ही वेळोवेळी आपणास लेखी, तोंडी निवेदने दिलेली आहे, परंतु ग्रामपंचायतीने याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यापलीकडे काहीही केलेले नाही.

वरील समस्या ग्रामपंचायतीने तात्काळ सोडवाव्यात अन्यथा ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल,होणाऱ्या परिणामास ग्रामपंचायत जबाबदार राहील असे म्हटले आहे.तसेच माहितीस्तव जिल्हाधिकारी  लातूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर, गटविकास अधिकारी पंचायत समिती  लातुर यांना देण्यात आली आहे.  निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य अमर नाडे, मुरूड भाजपा शहर अध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य वैभव सापसोड, ग्रा.पं.सदस्य संतोष काळे,ग्रा.पं.सदस्य छायाबाई पुदाले आदींच्या सह्या आहेत.


अतिक्रमण धारकांनी ऊस पिके काढल्यानंतर रस्ता मोकळा केला जाईल तहसीलदार

No comments:

Post a Comment