अतिक्रमण धारकांनी ऊस पिके काढल्यानंतर रस्ता मोकळा केला जाईल तहसीलदार - latur saptrang

Breaking

Thursday, September 9, 2021

अतिक्रमण धारकांनी ऊस पिके काढल्यानंतर रस्ता मोकळा केला जाईल तहसीलदार

 मुरुड येथील पळसप रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास महसूल प्रशासनाचे कानडोळा




मुरुड (श्रीकांत टिळक) - येथील पळसप रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात तसेच प्लॉट वरील अतिक्रमण विषयी रवी माकुडे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते,  तहसिलदारांनी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.


उपोषण करते रवी माकुडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या ३५ वर्षापासून मुरुड गावचे सत्ताधारी दिलीप नाडे असून त्यांनी गाव नकाशावर असलेला शेतरस्ता गट नंबर ८०८,८०९,८१० पळसप रस्ता काबीज करून शेतकऱ्यासाठी व गावकऱ्यांसाठीचा हा रस्ता बंद केला आहे. प्लॉट मिळकत नंबर ४८६२ हा असून त्याची ग्रामपंचायत अट वर नोंद असून त्यावर ही असाच नियम बाह्य कब्जा केला आहे. 


वरील विषयी तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिली होती. तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला ही बसले होते.  तहसीलदार स्वप्निल पवार यांनी मंडळ अधिकारी यांना प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यास सांगितले होते मंडळ अधिकारी सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष जाऊन पळसप रस्त्यावर ऊस लागवडीचे अतिक्रमण असल्याचा पंचनामा करून तहसील कार्यालयात जमा केला होता, त्या अनुषंगाने तहसीलदार यांनी उपोषण करते माकुडे यांना तहसील कार्यालयात बोलावून सदरील तुमच्या प्लॉट संदर्भात कोर्टात जाण्याचे सांगितले तसेच पळसप रस्त्या संदर्भात अतिक्रमण धारक यांनी ऊस लावलेला आहे .त्यांचा ऊस कारखान्यात जाईल त्यावेळेस रस्ता मोकळा केला जाईल असे ते म्हणाले होते, तसेच अतिक्रमणधारकांनासाधी नोटीसही तहसीलदार यांनी पाठवलेली नव्हती .


उपोषणकर्ते माकुडे यांचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी दिनांक ३०/०४/२०२१ रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आठ तारखेला आमरण उपोषण करण्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी यांनी मुरुड मध्ये येऊन जागेचे पाहणी करेन असे माकुडे सांगितले होते. यावर अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेतील असे ही ते म्हणाले होते.


गाव नकाशावर असणारा पळसप रस्ता अतिक्रमण धारक यांनी कब्जा केलेला असताना देखील जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी तो रस्ता मोकळा करणे गरजेचे असताना हा रस्ता मोकळा न करता दिलीप नाडे  राजकीय व्यक्तीच्या नियमबाह्य कृतीला पाठीशी  घालण्याकरीता आपल्या कर्तव्यात कसूर करत भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारावर गदा आणीत आहेत.


उपजिल्हाधिकारी यांनी अतिक्रमण झालेल्या जागेची पाहणी करण्यास न आल्यामुळे आणि जिल्हाधिकारी यांनी निर्णय न  दिल्यामुळे उपोषण करते रवी माकुडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

No comments:

Post a Comment