साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस; पिंपळनेरच्या पांझरा नदीला पूर - latur saptrang

Breaking

Thursday, September 30, 2021

साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस; पिंपळनेरच्या पांझरा नदीला पूर



 पिंपळनेर : हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर साक्री तालुक्याच्या पिंपळनेर परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील  जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुसळधार पाऊस सातत्याने सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. लाटीपाडा, विरखेल, शेलबारी, जामखेडी, मालनगाव आदी सर्वच धरणे शंभर टक्के भरल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तर वाढलेले पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे.

पिंपळनेर शहरातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मार्गक्रमण करण्यात अडथळा निर्माण झाला आहे.शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे.

अनेक भागात पाणी साचल्याने पायी चालणे मुश्कील झाले आहे

डेंग्यू, चिकुनगुन्या, टायफॉइड, मलेरिया या साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, साथीच्या आजारांनी असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायतीने आरोग्य विभागाच्या सहकाऱ्याने गांभीर्याने लक्ष घालून त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.

बुधवारी (दि.३०) रोजी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे

पूरामुळे रस्ता झाला बंद

लाटीपाडा धरणातून ५ हजार ७०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पांझरा नदीला पूर आला आहे. तर जामखेडी धरणातून २ हजार १७८ क्युसेस विसर्ग सुरू आहे.

एकवीरा मंदिराजवळील व भातोजी महाराज मंदिराजवळील लहान पूल पाण्याखाली गेला आहे.

कुस्ती मैदानाजवळील लहान फरशीपूल प्रवाहात आला असून, त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे रस्ता वापरासाठी बंद झाला आहे.


विकास आणि पर्यावरणाचा सांधा म्हणून ‘मित्रा’ काम करेल; पर्यावरणाचा सन्मान राखूनच शाश्वत विकास शक्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
'जलयुक्त शिवार'मुळं मराठवाड्यात पूर; पर्यावरणतज्ज्ञांचा स्पष्ट आरोप



No comments:

Post a Comment