युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशन च्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार - latur saptrang

Breaking

Thursday, September 30, 2021

युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशन च्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार

आमदार गणपत गायकवाड, उपमहापौर भगवान भालेराव, जगदीश गायकवाड, सीमाताई आठवले, झरीन खान सन्मानित

मुंबई, दि. 30 : भारताने जगाला भगवान बुद्धांचा दया, शांती व करुणेचा संदेश दिला. बुद्ध धर्माचा पुढे चीन, जपान, श्रीलंका आदी अनेक देशात प्रचार-प्रसार झाला. भारत ही भगवान बुद्धांची भूमी असून भारताने सर्व धर्मियांचे येथे स्वागत केले. भगवान बुद्धांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कठीण परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन आपले जीवन लोक कल्याणासाठी व्यतीत केले. भगवान बुद्ध व डॉ.आंबेडकरांचे आदर्श पुढे ठेवून समाजाने एकदिलाने कार्य केले तर कोरोनासारखे कोणतेही संकट आले तरीही ते पराभूत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशनेच्या वतीने राजभवन येथे लोकसेवा गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले व फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप जगताप उपस्थित होते.

कोरोना महामारी कधी संपूर्णपणे जाईल हे सांगणे कठीण आहे असे सांगून कोरोनाला हरवून लोकांना जगवायचे ध्येय्य ठेवून कार्य केले पाहिजे असे उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले. यावेळी त्यांनी काव्याच्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन केले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी आमदार गणपत गायकवाड, उल्हासनगरचे उपमहापौर भगवान भालेराव, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई रामदास आठवले, इंग्लंड येथील हरबन्स विर्डी, अभिनेत्री डॉ.झरीन खान, यांचेसह 35 कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. प्रदीप जगताप संपादित दैनिक लोकधारा टाइम्सच्या करोना विशेषांकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

0000

 

Governor Koshyari presents Lokseva Gaurav Puraskars to Corona Warriors

Union MoS Ramdas Athawale applauds Corona Warriors through poetry

 

Mumbai, 30 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Lok Seva Gaurav Puraskar to 35 Corona Warriors from different walks of life at Raj Bhavan, Mumbai on Thursday (30th Sept). Union Minister of State for Social Justice and Empowerment Ramdas Athawale and President of the United Buddhist and Ambedkarite Foundation Pradip Jagtap were present.

The Governor presented the Lok Seva Gaurav Puraskar to MLA Ganpat Gaikwad, Deputy Mayor of Ulhasnagar Bhagwan Gaikwad, Panvel Deputy Mayor Jagdish Gaikwad, leader of Ambedkarite movement in England Harbans Virdee, actress Zarine Khan and wife of Ramdas Athawale Seema Athawale and other social workers. The Governor released the Special Issue of ‘Lokdhara Times’ edited by Pradip Jagtap on the occasion. Union Minister Ramdas Athawale applauded the Corona Warriors through a poetry.

Vandana Rajesh Mehta, Varun Sadashiv Patil, Ramesh Sudam Jadhav, Sadashiv Hender Patil, Ankush Krishna Gaikwad, Sanjay Baburao More, Divvesh L. Ganatra, B. R. Jagtap, Vandana Sonawane, Dr. Shubhangi Ratnaparkhi, Shilatai Anil Gangurde, Dr. Ram Wadhwa, Jitendra Sonar, Tukaram Namdev Jadhav, Prashant Kumar Tularam Mankar, Abhijeet Karanjule, Vishwanath Sonar, Ajit Ramchandra Sawant, Shruti Manish Patil, Dr. Karbhari Kharat, Hemant Ranapise, Babulal Bachher, Rajendra Jadhav, Amit Ojha, Kavita Santosh Shiktode, former Mayor Ramesh Jadhav, Rajesh Puraswani, Bhushan Pradip Jagtap were felicitated by the Governor on this occasion.

0000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2XZtO7C
https://ift.tt/3me4e7b

No comments:

Post a Comment