मुंबई, दि. १५ :- भारतातील अभियांत्रिकी क्षेत्राचे पितामह भारतरत्न सर एम. विश्र्वेश्र्वरैय्या यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे. आधुनिक भारताच्या उभारणीत देशातील अभियंत्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे नमूद करून, मुख्यमंत्र्यांनी अभियंता दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.
संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, स्वातंत्र्यानंतर भारतात पायाभूत क्षेत्रात तसेच अनेक महत्त्वाचे अभियांत्रिकी प्रकल्प उभे राहीले. या कामासाठी अनेक अभियंत्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. राष्ट्र उभारणीतील अभियंत्यांचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी या सर्वांना अभियंता दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. देशातील अभियांत्रिकी क्षेत्रात भरीव अशी कामगिरी करून, आदर्श निर्माण करणारे थोर अभियंते भारतरत्न सर एम. विश्र्वेश्र्वरैय्या यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
OOO
भारतातील अभियांत्रिकी क्षेत्राचे पितामह भारतरत्न सर एम. विश्र्वेश्र्वरैय्या यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले अभिवादन. आधुनिक भारताच्या उभारणीत देशातील अभियंत्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी अभियंता दिनाच्याही दिल्या शुभेच्छा. pic.twitter.com/kgDudIgttv
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 15, 2021
राज्यपाल गणरायापुढे नतमस्तक; राजभवन परिवारासोबत केली आरती
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2YZIVhZ
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment