फातिमाबी शेख यांच्या कवितेचे प्रकाशन करतांना ज्येष्ठ साहित्यीक श्रीपाल सबणीस,मधुकर भावे,अॅड.अय्युब शेख, कवी अॅड. हाशम पटेल,शबाना मुल्ला
पुणे :- ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था,महाराष्ट्र च्या वतीने अनिसा सिकंदर शेख, व सय्यद दिलशाद यासीन यांच्या द्वारे संपादीत फातिमाबी शेख प्रातिनिधिक कवितासंग्रह या पुस्तकाचे प्रकाशान दिमाखात पुणे येथे पार पडले .
प्रथमच ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचा कार्यक्रम पुणे येथे भारताच्या पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका फातीमाबी शेख यांच्यावर आधारित प्रातीनिधीक कविता संग्राहाचे आखील भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस सर यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले व त्या वेळी प्रसिध्द पत्रकार मधुकर भावे सर तसेच अँड.हाशम पटेल सर यांची प्रमुख उपस्थिती हाेती. या वेळी निमंत्रिताचे कविसंमेलन झाले . सदरील कार्यक्रमासाठी संस्थापक शफी बोल्डेकर सर व केंद्रीय सचिव डॉ .सय्यद जब्बार पटेल सर ,खाजभाई बागवान ,प्रा.डाँ.शेख म.रफी सर,अनिसा शेख मँडम ,दिलशाद सय्यम मँडम ,मगदुम सर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले .
No comments:
Post a Comment