लातूर :- लातूर शैक्षणिक पॕटर्न चे जनक, राजर्शी शाहू महाविद्यालये प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी मनाशी संवाद हे आ आत्मचरित्र लिहील्या बद्दल सर्वोत्तम चॕरिटेबल ट्रस्ट व क्रेडाई लातूर च्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
आज लातूरमध्ये सर्व क्षेत्रात चौफेर डेव्हलपमेंट होत आहे, या विकासात व सांस्कृतिक वारसा जपण्यात ज्यांनी लातूर चा शैक्षणिक पॕटर्नचा बेस मजबूत तयार केला ते शाहू कॉलेज चे सचिव अनिरुद्ध जाधव सरांचा सिंहाचा वाटा आहे.या जीवन प्रवासात, पुढे जाताना दिलेली सत्व परीक्षा, आलेल्या अडचणी, मिळालेली साथ, केलेला त्याग, कठोर शिस्तीचे पालन, प्रसंगानुरुप राबवलेले नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम यावर प्रकाश टाकत सरांनी आपले मनाशी संवाद-आपुलाची वाद आपणाशी हे आत्मचरित्र लिहीले आहे. साहित्य क्षेत्रात एका चांगल्या अनुभव कथन कादंबरीची भर पडली. पुढील पिढीला हे पुस्तक निश्चितपणे मार्गदर्शक ठरणार आहे. म्हणून सर्वोत्तम परिवार व क्रेडाई परिवाराच्या वतीने जाधव सरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात बोलताना जाधव सरांनी जीवनवृत्तांत सांगितला. समाजात वावरताना टोकाची टिका कधीही करु नये. जीवनात अशक्य अस काही नसत.प्रत्येक विद्याथ्याने ध्येयवादी बनल पाहिजे व ध्येयप्राप्तीसाठी प्रचंड मेहनत घ्यायला शिकल पाहिजे. या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाने काळानुरुप बदल स्विकारले पाहिजे तरच आपण या स्पर्धेच्या युगात टिकणार आहोत अशा प्रकारचे मत जाधव सरांनी व्यक्त केले. यावेळी रंजना चव्हाण, खय्युम सय्यद , उदय पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक उत्तम शेळके , सुत्रसंचालन, दत्तात्रय दापके तर आभार तृप्ती आंधुरे यांनी मांडले.
कार्यक्रमासाठी कल्पना पवार, जीवनकला जाधव , महेश नावंदर, संतोष हात्ते, नागनाथ गित्ते, योगेश सांडूर, रनविर उमाटे, सचिन आहेरकर , रनविर सुर्यवंशी , विष्णू मदने हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment