मोदींच्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढणार, ओवैसींची घोषणा - latur saptrang

Breaking

Monday, September 20, 2021

मोदींच्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढणार, ओवैसींची घोषणा

 




अहमदाबाद : गुजरात दौऱ्यावर असलेल्या 'ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन' (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी एक मोठी घोषणा केलीय. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात एआयएमआयएम पूर्ण ताकदिनिशी उतरणार असल्याची घोषणा ओवैसी यांनी केलीय.


गुजरातमध्ये संघटनेला बळ देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही ओवैसी यांनी म्हटलंय. गुजरातमध्ये नेमक्या किती जागांवर निवडणुका लढवणार याचा निर्णय पक्षाचं गुजरात युनिट घेईल, असंही ओवैसी यांनी स्पष्ट केलंय.

यावेळी, १९८४ नंतर गुजरातनंतर कोणत्याही मुस्लीम व्यक्तीला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नाही, याचा उल्लेख ओवैसी यांनी आवर्जुन केला.यावेळी, ओवैसी यांनी राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. राहुल गांधी यांनी आपला पारंपरिक मतदारसंघही गमावला. तिथे आमच्याकडे उमेदवार उपलब्ध नव्हता. वायनाडमध्ये ३५ टक्के मतदार अल्पसंख्यांक असल्यानंच काँग्रेसला हा मतदारसंघ जिंकता आला. त्यामुळे आम्हाला पाहताच ए टीम, बी टी, वोट कटर अशी नावं देणं सुरू करतात. परंतु, आता लोकच निर्णय घेतील.

तुम्ही मुस्लीम मतदारांमुळे हरला असाल किंवा गैर मुस्लीम मतदारांमुळे परंतु पराभव झालाच. काँग्रेसचे लोक भाजपमध्ये सहभागी झाले ही काही आमची जबाबदारी असू शकत नाही. काँग्रेसनं माझ्यावर कितीही आरोप केले तरी मला त्याचा काहीही फरक पडत नाही, असंही यावेळी ओवैसी यांनी म्हटलंय.

उत्तर प्रदेशात गेल्या तीन वर्षांत एकाही मुस्लीम व्यक्तीला घर मिळालेलं नाही. यूपीत आतापर्यंत हजारांहून अधिक धार्मिक दंगली उसळल्या आहेत. तसंच राज्यात भाजपच्या ३७ आमदरांविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, असं म्हणत ओवैसी यांनी राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.
----------------------------------------------------------------------------------------------------------
राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, संपूर्ण मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी

No comments:

Post a Comment