*भारताच्या प्रगतीमध्ये देशातील ऊर्जा क्षेत्राची खूप मोठी भूमिका - केदार खमितकर* - latur saptrang

Breaking

Monday, September 20, 2021

*भारताच्या प्रगतीमध्ये देशातील ऊर्जा क्षेत्राची खूप मोठी भूमिका - केदार खमितकर*

 

उदगीर : सोमवार दि २० सप्टें  रोजी 'ऊर्जा संवर्धन संधींची ओळख व विकास' या विषयावरती पीसीआरए यांच्यावतीने डोमेस्टिक

कार्यशाळा आयोजित करण्यात आले त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. भारताच्या प्रगतीमध्ये देशातील ऊर्जा क्षेत्राची खूप मोठी भूमिका आहे. हे एक असे क्षेत्र आहे जे सुसह्य जीवन आणि व्यवसाय सुलभता या दोन्हीशी निगडित आहे. आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टासह आज जेव्हा देश वाटचाल करत आहे तेव्हा त्यात ऊर्जा क्षेत्र, अक्षय ऊर्जा क्षेत्राची महत्वपूर्ण भूमिका आहे असल्याचे खमितकर यांनी कार्यशाळेत सांगितले. महारा





ष्ट्र एज्युकेशन सोसायटी उदयगिरी महाविद्यालयाच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. संस्थेचे सचिव प्रा. मनोहर पटवारी माजी आमदार यांची मुख्य उपस्थिती होती. मुख्य मार्गदर्शक पीसीआरए चे व्याख्याता केदार खमितकर होते. ऊर्जा पडताळा (Energy Audit) या प्रक्रियेमध्ये ऊर्जा वापराचा अभ्यास केला जातो आणि ऊर्जेचा खर्च कमी करण्यासाठी कोणत्या पर्यायांचा वापर केला जाऊ शकतो याचे विश्लेषणही केले जाते. ऊर्जा पडताळा या संकल्पनेमध्ये ऊर्जेच्या वापराची पडताळणी आणि देखरेख यांचा अंतर्भाव होतो. तसेच यामध्ये खर्च- फायद्याच्या विश्लेषणासह ऊर्जा कार्यक्षमता सुधारित करण्यासाठी ऊर्जेचा वापर कमी करण्याच्या कृती योजनेसह तांत्रिक अहवाल सादर केला जातो. ज्या ठिकाणी ऊर्जेचा अपव्यय होत आहे, परंतु जेथे सुधारणेला वाव आहे अशा क्षेत्रांची ओळख करून ऊर्जेचा खर्च कमी करणे ह्या कारणामुळे ऊर्जा पडताळ्याची आवश्यकता असल्याचे ऊर्जा लेखापरीक्षक खमितकर यांनी नमूद केले. उपप्राचार्य राजेंद्र मस्के सर, राजयोगिनी ब्र.कु.महानंदा दीदी, ब्र.कु. मिरा दीदी व इतर महाविद्यालयातील शिक्षकोत्तर कर्मचारी उपस्थित होते. पीसीआरए जनजागृती माहितीपट यावेळी दाखविण्यात आले. समारोप इंधन सक्षम प्रतिज्ञाने करण्यातआला. यावेळी उपस्थित सदस्यांनी शासनाच्या कोवीड-१९ नियमांचे पालन करून मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.


No comments:

Post a Comment