गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला JioPhone Next अवघ्या काही दिवसात आता विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ग्राहकांकडून अनेक दिवसांपासून खरेदीसाठी या फोनची वाट पाहिली जात आहे. हा भारतातील सर्वात स्वस्त ४जी स्मार्टफोन असेल. डिव्हाइसला Google आणि Jio च्या भागीदारी अंतर्गत तयार करण्यात आले आहे. फीचर फोनमधून स्मार्टफोनमध्ये कनव्हर्ट करण्याचा विचार करत असलेल्यांसाठी JioPhone Next एक चांगला पर्याय असेल. हा फोन १० सप्टेंबरपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. तुम्ही जर फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फक्त काही तास वाट पाहावी लागेल. जिओफोन नेक्स्ट बाजारात उपलब्ध सर्व स्मार्टफोन्सच्या तुलनेत खूपच स्वस्त असेल. यासोबतच, फोन खरेदीसाठी कंपनी ग्राहकांना वेगवेगळा पर्याय देखील देत आहे. यातील एक पर्याय म्हणजे फोनला ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत प्री-बुक करता येईल.
रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओ ग्राहकांना वेगवेगळ्या पेमेंट मोडद्वारे फोन खरेदी करता यावा यासाठी भारतीय बँकांसह करार करत आहे. रिलायन्स जिओ स्टेट बँक, पिरामल कॅपिटल, आयडीएफसी फर्स्ट एश्योर आणि डीएमआय फायनान्ससोबत करार करू शकते. पुढील ६ महिन्यात ५० मिलियन यूनिट्सची विक्री करत १० हजार कोटींच्या व्यवसायाचे कंपनीने लक्ष्य ठेवले आहे. या फोन वन-टाइम पेमेंटद्वारे उपलब्ध असेल. ग्राहक सुरुवातीला काही पेमेंट करून देखील फोनला खरेदी करू शकतील.
रिपोर्टनुसार, जिओफोन नेक्स्ट दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याच्या बेसिक मॉडेलची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल. फोनच्या Advance मॉडेलची किंमत जवळपास ७ हजार रुपये असू शकते. ज्या लोकांना फोन खरेदी करायचा आहे ते ५०० रुपये देऊन बुक करू शकतात. इतर रक्कम पेमेंट बँक अथवा लँडिंग पार्टनरसोबत ईएमआयवर देता येईल. ईएमआयवर व्याज लागेल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
Reliance Jio ने नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. याद्वारे ग्राहकांना लोनचा पर्याय मिळेल. क्रेडिट सपोर्ट डील २,५०० कोटी रुपयांची सांगितली जात आहे. म्हणजेच, ग्राहक फोनला फायनान्स अंतर्गत घेऊ शकतात. मात्र त्यांना थोडे अधिक पैसे द्यावे लागतील. रिपोर्टनुसार, JioPhone Next ची सुरुवाती किंमत ३,४९९ रुपये असू शकते. कंपनीकडून अद्याप किंमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, कंपनीकडून हा जगातील सर्वात स्वस्त अँड्राइड स्मार्टफोन असेल असा दावा केला जात आहे.
फोनच्या काही फीचर्सबद्दल माहिती समोर आली आहे. यात गुगल सर्व्हिसेचा उपयोग करता येईल. फोनमध्ये अँड्राइड सॉफ्टवेअर अपडेट्स देखील मिळतील. हा फोन अँड्राइड गो एडिशनसोबत येईल. फोनमध्ये यूजर्सला अँड्राइडचे बेसिक एक्सपीरियन्स दिले जाईल. फोनचा इंटरफेस क्लिन असेल. यूजर्सला गुगल प्ले स्टोरवरून अॅप्स देखील डाउनलोड करता येतील. मात्र, फोनमध्ये सर्वच अॅप काम करणार नाही. यात गुगल असिस्टेंटचा देखील सपोर्ट मिळू शकतो. यात टेक्स्ट लँग्वेज ट्रांसलेशनसाठी ऑटोमॅटिक रीडिंग उपलब्ध केले जाईल. सोबतच, फोनमध्ये भाषा देखील बदलू शकता.
No comments:
Post a Comment