पुढच्या आठवड्यात धुरळा उडणार, Flipkart Big Billion Days सेल आठवडाभर चालणार, 'हे' स्मार्टफोन गाजवणार सेल - latur saptrang

Breaking

Tuesday, September 21, 2021

पुढच्या आठवड्यात धुरळा उडणार, Flipkart Big Billion Days सेल आठवडाभर चालणार, 'हे' स्मार्टफोन गाजवणार सेल



 नवी दिल्लीः फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज (Flipkart Big Billion Days) सेल यावेळी खास असणार आहे. या सेलमध्ये बेस्ट ऑफर आणि डील्स सोबत अनेक नवीन स्मार्टफोन लाँच होणार आहे. नवीन स्मार्टफोन लाँच करणाऱ्या कंपनीमध्ये मोटोरोला, ओप्पो, पोको, रियलमी, सॅमसंग आणि विवोच्या नावाचा समावेश आहे. याशिवाय, २४ सप्टेंबर रोजी रियलमी आपला नार्जो ५० सीरीजला लाँच करणार आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, बिग बिलियन डे सेल २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.




दुपारी साडेबारा वाजता लाँच होणार रियलमी ५० सीरीज
फ्लिपकार्टवर लाइव्ह झालेल्या मायक्रोसाइटच्या माहितीनुसार, या सेलमध्ये ६ कंपन्या आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. नवीन लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्स मध्ये रियलमी नार्जो ५० सीरीजची खूप मोठी चर्चा आहे. कंपनी या सीरीजच्या स्मार्टफोन्सला २४ सप्टेंबर रोजी लाँच करणार आहे. नार्जो ५० सीरीजच्या लाँच इव्हेंटची सुरुवात दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. या सीरीज अंतर्गत चार स्मार्टफोन रियलमी 50i, 50A, 50 आणि 50 प्रो ला लाँच करणार आहे.

या तारखेला लाँच होणार बाकीच्या कंपनीचे फोन

दुसऱ्या कंपनीमध्ये ओप्पो २७ सप्टेंबर रोजी या सेलमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. ओप्पोनंतर २८ सप्टेंबर रोजी सॅमसंग, ३० सप्टेंबर रोजी पोको आणि विवो आपल्या नवीन हँडसेटला लाँच करणार आहे. याशिवाय, मोटोरोला १ ऑक्टोबर रोजी भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.


हे स्मार्टफोन होऊ शकतात लाँच
२८ सप्टेंबर रोजी सॅमसंग आपला गॅलेक्सी एम सीरीजचा नवीन स्मार्टफोन Galaxy M52 5G ला लाँच करणार आहे. काही रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, सॅमसंगचा हा फोन अॅमेझॉन इंडिया वर लाँच होणार आहे. या दिवशी कंपनी आपले दुसरे प्रोडक्ट्स फ्लिपकार्टवर लाँच करणार आहे.

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेल मध्ये ओप्पो आपल्या नवीन स्मार्टफोन Oppo A55 वरून पडदा हटवला जावू शकतो. फ्लिपकार्टवर लाइव्ह मायक्रोसाइट नुसार ओप्पोचा एक नवीन स्मार्टफोन २७ सप्टेंबर रोजी लाँच केला जाणार आहे. हे अजून कन्फर्म नाही की, हा फोन A55 आहे की दुसरा आहे.

No comments:

Post a Comment