मुरूड (श्रीकांत टिळक) :- संभाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. नरेंद्र जी .माळी व मा.दिपक भैय्या पठाडे यांच्या शुभ हस्ते दोन्ही महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.माळी म्हणाले की, राजकीय विचारवंत आणि राजकीय नेते या दोन्ही दृष्टिंनी महात्मा गांधींजींचे स्थान भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अग्रस्थानी आहे. म.गांधी यांनी चरखा आणि खादी यांचा पुरस्कार केला कारण ग्रामीण संस्कृतीचा विकास, ग्रामीण कला कौशल्यांचे पुनरूज्जीवन त्यांना अभिप्रेत होते. म.गांधी यांनी मुलोद्योगी शिक्षण योजना मांडून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करावा यावरती मौलिक विचारांची मांडणी केली.तसेच भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान' हा नारा देवून देशातील तमाम शेतकऱ्यांच्या श्रमाचा व देशातील जवानांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान केला आहे.या दोन्ही महापुरूषांच्या जीवन कार्याचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. चावरे एम. व्ही., प्रा.डॉ.मीना कदम, प्रा.डॉ.गोरे बी. एम., प्रा. चव्हाण डी. आर., प्रा. डॉ. जाधव जी. एल., प्रा. डॉ. उबाळे एस. एन., प्रा. मोतिबोने तसेच बंकट घुटे, अरुण सवासे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment