शंभर टक्के पीक विमा देण्यासाठी कंपनींना आदेश द्यावे :- अॅड. धनराज शिदे - latur saptrang

Breaking

Sunday, October 3, 2021

शंभर टक्के पीक विमा देण्यासाठी कंपनींना आदेश द्यावे :- अॅड. धनराज शिदे



मुरूड (श्रीकांत टिळक):- लातुर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई व मदत जाहीर करून देण्याची मागणी केली आहे.  भाजपा युवा मोर्चा तालुका लातूर यांच्या तर्फे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.                                                

     दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लातूर तालुका मध्ये गेल्या पाच ते सहा दिवसापासून सततच्या अतिवृष्टी ढगफुटीमुळे व नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान  झाल्यामुळे शेतीतील पिकाचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मदत जाहीर करावी व शंभर टक्के पीक विमा देण्यासाठी कंपनींना आदेश द्यावे .                             

    या मागणीसाठी आमदार रमेश आप्पा कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा तालुका लातूर यांच्या तर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.                                       

    यावेळी उपाध्यक्ष प्रशांत शिंदे, शुभम खोसे, सरचिटणीस समाधान कदम, कोषाध्यक्ष बालाजी गवळी, सोशल मीडिया अध्यक्ष अच्युत भोसले, किशोर काटे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment