मुरुड (श्रीकांत टिळक) :- मुरुड येथे आज महाराष्ट्र नाभिक समाजाची बैठक पार पडली या बैठकी साठी आज लातूर जिल्ह्याचे नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष मा. भाऊसाहेब शेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली . या बैठकीस अमोल सावंत नाभिक जिल्हा युवा अध्यक्ष लातूर, दिनकर दिघे जिल्हा उपाध्यक्ष लातूर,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गायकवाड सर होते. मुरुड येथील नाभिक बांधवास मार्गदर्शन करताना समाजाने कुठल्या दिशेने वर जाऊन समाजकार्य केले पाहिजे, समाज कार्यामध्ये नाभिक समाज आज कुठल्या क्षेत्रात पर्यंत जाऊ शकतो , जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शेंद्रे यांनी करून दिली. पेट्रोल डिझेल गॅस किराणा याचे भाव फार प्रमाणात वाढले आहेत .त्या अनुषंगाने आपल्या दुकानातून ग्राहकांना अजून जास्त चांगल्या सुविधा देऊन कटिंग दाढी चे दर वाढविण्यासाठी सूचना दिले आहेत.असून नाभिक समाजाने या गोष्टीकडे लक्ष देऊन समाज एकत्रित करून येणाऱ्या भविष्य काळामध्ये शासनाकडून येणाऱ्या सर्व शासकीय सेवा मदतीसाठी आपण एकजुटीने साथ द्याल अशी अपेक्षा त्यांनी बाळगली आहे .या बैठकीमध्ये युवकांना अमोल सावंत जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष यांनी योग्य मार्गदर्शन केले. तसेच आपल्या नाभिक समाजातील पालकांनी यांनी आपल्या पाल्याला शिक्षणावर लक्ष जास्त द्यावे. यावेळी महाराष्ट्र नाभिक मुरुडचे शहराध्यक्ष दत्ता गोरे व मार्गदर्शन केले.यावेळी नाभिक दुकानदार असोशियन चे अध्यक्ष पिंटू जाधव, उपाध्यक्ष विनोद सुरवसे, सचिव नागू क्षिरसागर, व्यंकटेश आतकरे ,अशोक राऊत ,भरत धाकतोडे, किरण मस्के, संजय धाकतोडे ,सचिन गोरे केशव गवळी, भीमराव लाडे, तात्या गवळी, हनुमंत राऊत ,दिपक सुरवसे सर्व नाभिक असोसिएशनचे सदस्य या बैठकीत उपस्थित होते.अशी माहिती मुरुडचे शहराध्यक्ष दत्ता गोरे यांनी दिली .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment