मुरूड (श्रीकांत टिळक ):- मुरूड परिसरात नामांकित असणाऱ्या व स्वर्गीय गोरोबा (काका) झाडके यांच्या आधाराने निर्माण झालेल्या श्री छत्रपती शाहू मॉडर्न इंग्लिश स्कूल या शैक्षणिक संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी व तत्कालीन माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली.
संस्था अध्यक्ष दीपक झाडके व संस्था सचिव दत्तात्रय जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार तर संस्था कोषाध्यक्ष शंकर पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
तसेच गांधीजींचे शैक्षणिक विचार समाजाला खऱ्या अर्थाने तारू शकतात आपल्या शैक्षणिक उद्देशातून शरीर , मन , आणि आत्म्याचा विकास म्हणजे शिक्षण हीच शैक्षणिक प्रक्रिया आपणही राबवणे गरजेचे आहे. आपल्या शाळेत प्रवेशित होणाऱ्या प्रत्येक बालकाचा शारीरिक , बौद्धिक , मानसिक व आत्मिक विकास साधणे यावर आपण सर्व शिक्षकांनी भर दिला पाहिजे असे मत या वेळी शंकर पाटील सरांनी व्यक्त केले. या दिवशी शाळेने एक ए दोन या परीक्षेचा निकाल व पालक शिक्षक बैठकीचे आयोजन केले होते, त्यास पालकांचा भरभरून प्रतिसाद होता .यावेळी मुख्याध्यापक अभिषेक गुप्ता, उपमुख्याध्यापक उमेश कुंभार , समन्वयक रामेश्वर शेटे , क्रीडाशिक्षक राजेश बावळे , भूषण गिराम व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment