लातूर : दि. १ ऑक्टो. रोजी पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ यांच्या वतीने श्री गोदावरीदेवी लाहोटी विद्यालयाच्या सभागृहात डोमेस्टिक वर्कशॉप आयोजित करण्यात आले. आज जतन केलेला निसर्ग उद्या दर्जेदार जीवनाची हमी आहे, ऊर्जा संवर्धनासाठी सोप्या नियमांचे अनुसरण करून निरोगी आणि सुंदर जगाच्या विकासात योगदान द्यावे. उर्जा बचत करून आपण ग्लोबल वार्मिंगविरूद्धच्या लढ्यात हातभार लावावे असे आवाहन केदार खमितकर यांनी कार्यशाळेत केले. कार्यशाळेत सुनीता बोरगावकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.'ईंधन संरक्षण की दिशा में छोटे छोटे कदम बहोत बड़ा परिवर्तन ला सकते है' - या विषयावरती पीसीआरए चे व्याख्याता खमितकर यांनी मार्गदर्शन केले.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आले. निसर्गाचे संरक्षण आपल्या स्वत: च्या घरापासून सुरू होते, इंधन संवर्धनाच्या दिशेने छोट्या पावलांनी मोठा फरक पडू शकतो- कारण संपूर्ण प्रमाणात हे जनजागृतीद्वारे कमीतकमी एक औष्णीक ऊर्जा प्रकल्प बंद करण्यास मदत करेल, म्हणून उपकरणाचे अधिक कार्यक्षम मॉडेल वापरावे: वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर इ.) लाईटचे बटन बंद करण्यास विसरू नये, कारण प्रत्येक किलोवॅट विजेमुळे सुमारे 500 ग्रॅम कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात सोडले जाते - ही गॅसच "ग्रीनहाऊस" परिणामाचे कारण मानले जाते.'घरगुती गॅसचा अतिरिक्त वापर टाळा, इंधन वाचवा आणि बचत वाढवा' असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यशाळेत श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयाच्या शिक्षिका सर्वाधिक संखेने सहभागी झाले होते. यावेळी प्रश्नोत्तरी स्पर्धा विजेत्यांस मुख्य अतिथींच्या हस्ते पीसीआरएची पुस्तिका व पारितोषिक बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सूत्र संचालन श्रीमती देशपांडे मॅडम यांनी केले. समारोप इंधन संरक्षण प्रतिज्ञा द्वारे करण्यात आला. पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय इंधन बचत मोहिम औद्योगिक, वाहतूक, कृषी आणि घरगुती क्षेत्रात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment