मुंबई, दि. ३१ : प्रभाकर जोग यांच्या निधनाने ‘गाणाऱ्या व्हायोलिनचा जादूगार’ हरपला अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
आपल्या शोकसंदेशात श्री. देशमुख म्हणले की, सहा दशकांहून अधिक काळ व्हायोलिन वादक म्हणून कारकीर्द गाजवली. ‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून प्रभाकर जोग हे स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहिती झाले. प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, त्यामुळे त्यांचे व्हायोलिन ‘गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जाते. व्हायोलिनला गायला लावणारा, शब्दांपलिकडे जाऊन त्यातून आर्त भावना व्यक्त करण्याची किमया साधणारा संगीत क्षेत्रातील एक सच्चा साधक आपण आज गमावला आहे. श्री. जोग यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो, हीच प्रार्थना.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3BsKzpL
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment