मुंबई, दि. ३१ :- माजी उपपंतप्रधान, गृहमंत्री लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे अभिवादन केले.
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या ‘राष्ट्रीय एकता दिवस’ निमित्त मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.’ सरदार पटेल यांनी स्वतंत्र भारताला एका सुत्रात गुफंण्यासाठी अद्वितीय असा मुत्सद्दीपणा दाखवला. भारताची अखंडता आणि एकात्मता यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. यातूनच सशक्त असा भारत उभा राहिला. आज आपण राष्ट्रीय एकता दिवस साजरा करताना बलशाली, समृद्ध भारत निर्माण करण्याची प्रतिज्ञा घेऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2ZDqdNV
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment