मुंबई, दि. ३१ : पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आणि माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता तसेच अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ आज देशात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने मंत्रालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री नवाब मलिक यांनी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ निमित्ताने राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करण्याची, देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चीत करण्याकरिता योगदान देण्याची उपस्थितांना शपथ दिली.
या कार्यक्रमावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अधिकारी आणि कर्मचा-यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.
०००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3BtMWZt
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment