लातूरच्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभागरचना उत्तर दिशेकडून होणार - आयुक्त अमन मित्तल. - latur saptrang

Breaking

Monday, October 11, 2021

लातूरच्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभागरचना उत्तर दिशेकडून होणार - आयुक्त अमन मित्तल.

लातूर - महाराष्ट्र राज्यातील महापालिकेची प्रभाग रचना तीन सदस्यीय करण्यावर मंत्रीमंडळाने शिक्कामोर्तब केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना व कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत त्यानुसार आता महापालिका प्रशासनाने नवीन प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू केली आहे शहरात आता नव्याने २३ प्रभाग होणार अआहेत शहरातील उत्तर दिशेकडून ही प्रभाग रचना असुन दक्षिण दिशेला याचा शेवट होणार आहे
 महानगरपालिकेची सदस्य संख्या ७० राहणार आहे तर सध्या चार प्रभाग रचना होती त्यात १८ प्रभाग होते आता नवीन रचनेत २३ प्रभाग होणार आहेत यात २२ प्रभाग हे तीन सदस्याचे असतील तर एक प्रभाग हा चार सदस्यांचा असेल प्रभाग रचनेची दिशा हि निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार महानगरपालिकेची प्रभाग रचनेची दिशा ठरवली जाणार आहे यात प्रभाग रचना सुरू करत असतांना सर्व प्रथम उत्तर दिशेने सुरवात करण्यात येणार आहे उत्तरेकडून ईशान्य ( उत्तर पुर्व ) त्यानंतर पुर्व दिशेकडून येवून पुर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत याचा शेवट दक्षिण दिशेने काढला जाणार आहे प्रभाग क्रमांकही त्याच पध्दतीने दिले जाणार आहेत प्रभागरचनेला नाव देण्याचे अधिकार निवडणूक आयोगाने आयुक्तांना दिले आहेत  पण प्रभागांना नाव देणे हे बंधनकारक नाही तरी देखील प्रभागांना नाव देता येतील का हे तपासून पाहावे असे आदेश हि आयोगाने दिले आहेत आयोगाकडून होणार तपासणी राज्यभरातच मागील अनेक निवडणुकीत क्षेत्रीय अधिका-या कडून अनेकदा चुका झाल्याने आयोगाला दिसून आले आहे राजकीय दबावाला बळी पडून अयोग्य प्रकारे प्रभागरचना केली जात आहे दैनिक सकाळ दिनांक ०८ आँक्टोबर २०२१ वरुन तसेच प्रभाग रचना बाबतीत न्यायालयीन लढा दाखल होताहेत हे सर्व पाहता आता महानगरपालिकेने कच्च्या आराखडा निवडणूक आयोगाकडून तपासला जाणार आहे त्यामुळे महानगरपालिकेची जवाबदारी वाढली आहे
अमन मित्तल - आयुक्त महानगरपालिका लातूर 
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालीकेच्या प्रभाग रचना होणार आहे २३ प्रभाग राहणार असून यात २२ प्रभाग हे तीन सदस्यांचे तर एक प्रभाग हा चार सदस्यांचा राहणार आहे सदस्य संख्या पहिल्या सारखीच ७० राहणार आहे प्रशासनाने प्रभाग रचनेचा कच्च्या आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले असून एक महिन्यात तो सादर केला जाणार आहे
 एकुण लोकसंख्या -३,८२, ९४०/- अनुसूचित जातीची लोकसंख्या ६१, १५४ , अनुसूचित जमाती लोकसंख्या ५५५० , सदस्य ७० एकुण प्रभाग २३ तीन सदस्य २२ प्रभाग चार सदस्य एक प्रभाग संख्या

No comments:

Post a Comment