लातुर :- निलंगा येथील जुने पोलीस स्टेशन येथे ग्रामीण पोलीस चौकी व शहरात दामिनी पथकाची नियुक्ती करा अशी मागणी शेरे-ए-हिंद शहीद टिपू सुलतान संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेत्रत्वात देऊन केली आहे
निवेदनात म्हनटले आहे की शहरातील जुने पोलीस स्टॅशन मुख्य ठिकानी असून भव्य इमारत, फर्निचर सर्व उपयोगी वस्तू उपलब्ध आहेत शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी याठिकाणी ग्रामीण पोलीस चौकी सुरू करण्यात यावी व सोबतच सीमालगत भागातील शेवटचा व मोठा तालुका असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातुन विध्यार्थीनी व विद्यार्थी शिक्षणासाठी येतात त्यांची छळ हाऊ नये व रोड रोमियोनचा बंदोबस्त व्हावा म्हणून महाविद्यालयीन भागात, खाजगी शिकवणी व बस स्थानक अशा भागामध्ये(शहरात)दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे.सदररील निवेदनावर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मुजीब सौदागर, नईम खतीब,गौस शेख,हिरा कादरी,सोहेल शेख,खडके माजिद, शाहरुख शेख,वाजीद शेख,महेमुद शेख,वहाब सितारी,रवी चौधरी, विनोद कुंभार, सय्यद अमन,हुसेन शेख,सुनिल सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
No comments:
Post a Comment