मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन - latur saptrang

Breaking

Saturday, October 2, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. 02 :-  माजी प्रधानमंत्री दिवंगत लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिवंगत शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय योगदान देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांनी पुढे प्रधानमंत्री म्हणून कणखरपणे देशाचे नेतृत्व केले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीतून त्यांनी प्रखर राष्ट्रभक्तीचा आदर्श घालून दिला. ‘जय जवान, जय किसान’ घोषणेतून त्यांनी चैतन्य निर्माण केले. भारतमातेचे महान सुपुत्र माजी प्रधानमंत्री दिवंगत लालबहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3mla1YD
https://ift.tt/39f9xgE

No comments:

Post a Comment