मुंबई, दि. 02 :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना या स्वातंत्र्याचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मरण आणि त्यांना वंदन करणे आद्य कर्तव्य आहे. महात्मा गांधी यांचा जीवनमार्ग हाच एक संदेश आहे. स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा यासह स्वच्छता, ग्रामविकासाबाबतची त्यांची शिकवण आपल्याला आजही मार्गदर्शक आहे. शांती, अहिंसेचे महान दूत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन, असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3mmzkK7
https://ift.tt/39f9xgE
No comments:
Post a Comment