लातूर/प्रतिनिधी: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून लातूर महानगरपालिकेकडून सर्वोतोपरी पूर्वतयारी केलेली आहे. वैद्यकीय सुविधा बळकट करण्यात आल्या आहेत. तसेच २०हजार रेमेडिसिवर इंजेक्शन, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स व १० बायपॅप मशीन विविध संस्थांच्या मदतीने उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेला लातूर मनपाने यशस्वीपणे तोंड दिले. बाधित रुग्णांवर उपचारासाठी अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. आता तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आलेला आहे. ही शक्यता गृहीत धरून मनपाकडून तयारी केली जात आहे. यामध्ये भर पडत सिपला कंपनी कडून सामाजिक दायित्व अंतर्गत २० हजार रेमेडिसिवर इंजेक्शन उपलब्ध झालेले आहेत. यासोबतच सीआयआय फाउंडेशन व तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी यांच्याकडून २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स व १० बायपॅप मशीन मनपास उपलब्ध झाल्या आल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी हे साहित्य अतिशय उपयोगी ठरणार असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे साहित्य खरेदी करण्यासाठी मनपाला एक रुपयाही खर्च करावा लागला नाही. वैद्यकीय क्षेत्रातील ख्यातनाम सिपाला कंपनी तसेच सीआयआय फाउंडेशन व तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी यांनी हे साहित्य सामाजिक दायित्व अंतर्गत मोफत उपलब्ध करून दिले आहेत.
हे साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे व आयुक्त अमन मित्तल यांनी सिपला, सीआयआय फाऊंडेशन व तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे लातूरकरांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.
No comments:
Post a Comment