मुंबई, दि. 4 : अर्जेंटिनाचे राजदूत ह्यूगो गोबी यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोहोंमध्ये राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि उद्योग या विषयांवर चर्चा झाली.
यावेळी मुंबई वाणिज्यदूतातील राजकीय विभागाचे प्रमुख रेनाटो मोरालेस, मुंबईतील वाणिज्यदूत गिलर्मो एड्युआर्दो डेव्होतो, सहवाणिज्यदूत सिसिलिया मोनिका रिसोलो आदी उपस्थित होते.
यावेळी उभयतांनी अर्जेंटिनाविषयी सादरीकरण केले. तर उद्योगमंत्री श्री.देसाई यांनी एमआयडीसीची माहिती चित्रफितीद्वारे विषद केली. दोन्ही देशांमध्ये अनेक विषयांत साम्य असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. विशेषतः फूटबॉल, व्हॉलीबॉल, टेनिस, पोलो आदी खेळांविषयी दोन्ही देशांतील नागरिकांना प्रचंड आकर्षण असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, खनिकर्म क्षेत्रात दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी एकत्रित बैठक घेऊन चर्चा करण्याचा प्रस्ताव श्री. देसाई यांनी ठेवला. त्याला शिष्टमंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला.
०००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3FiO2KT
https://ift.tt/39f9xgE
No comments:
Post a Comment