मुंबई, दि. १९ :- ईद-ए-मिलाद अर्थात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
ईद-ए-मिलादाचा उत्सव साजरा करताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, हजरत पैगंबर यांनी मानव कल्याणाचा मार्ग दाखविला. त्यांनी दिलेल्या शिकवणीला अनुसरून परस्परांचा आदर करूया, स्नेह वृद्धिंगत करूया. उत्सव साजरा करताना एकमेकांच्या आरोग्याचीही काळजी घेऊया. यातून प्रेषितांना अभिप्रेत समाज निर्माण होईल, सुख, समृद्धी नांदेल. त्यासाठी ईद-ए-मिलादाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा.
००००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3lSU2Cg
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment