: सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून गुरुवारी सलग तिसर्या दिवशी पेट्रोल, डिझेल दरात वाढ करण्यात आली. दरम्यान, देशात डिझेलने सुद्धा बघता बघता शंभरी गाठली आहे. मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी डिझेलने संभरी गाठली आहे.
ताज्या दरवाढीमध्ये पेट्रोल दरात झालेली वाढ 30 पैशांची आहे तर डिझेल दरात झालेली वाढ (diesel price) 35 पैशांची आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 109.25 रुपयांवर गेले आहेत तर डिझेलचे प्रति लिटरचे दर 99.25 रुपयांवर गेले आहेत.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर 80 डॉलर्स प्रतिबॅरलच्या वर गेले आहेत. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे. याच्या परिणामी तेल कंपन्यांकडून इंधन दरात वाढ सुरु आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 103.24 रुपयांवर गेले असून डिझेलचे दर 91.77 (diesel price) रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथे हेच दर क्रमशः 103.94 आणि 94.88 रुपयांवर गेले आहेत.
तामिळनाडूतील चेन्नई येथे इंधन दर क्रमशः 100.75 आणि 96.26 रुपयांवर गेले आहेत. मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात पेट्रोलचे दर 109.39 रुपयांवर तर डिझेलचे दर 99.68 रुपयांवर गेले आहेत. महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलने 111.81 रुपयांचा स्तर गाठला आहे.
No comments:
Post a Comment