मुंबई, दि. ६ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील अग्निकांडात झालेल्या जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयु विभागात झालेल्या दुर्दैवी अग्निकांडात काही निरपराध रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त समजून व्यथित झालो. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींना सद्गती लाभो, यासाठी प्रार्थना करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळवतो. दुर्घटनेतील जखमींना त्वरित बरे वाटावे ही प्रार्थना करतो, असे उत्तराखंड दौऱ्यावर असलेल्या राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3CRmmet
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment