मानवनिर्मित पूर परिस्थितीमुळे जमिनी खरडून गेल्याने आणि कर्जबाजारीपणामुळे निलंगा तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील 25 वर्षीय तरुण शेतकरी आकाश बंद यांनी डोंगरगाव येथील बॅरेज मध्ये उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी बन कुटुंबीयांची सोमवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन धीर दिला यावेळी माजी पालकमंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर होते.
अतिवृष्टी आणि मानवनिर्मित पूरपरिस्थितीमुळे नदीकाठच्या मोठ्या प्रमाणात जमिनी खरडून गेले आहेत अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पाच लाख रुपये मिळवून देण्यासाठी आणि शासनावर दबाव आणण्यासाठी मांजरा तेरणा शेतकरी बचाव यात्रा काढणार असल्याचे यावेळी संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बोलून दाखविले याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, जिल्हा परिषदेचे सभापती गोविंद चिलकुरे अँड संभाजीराव पाटील भाजपाचे मंगेश पाटील ज्ञानेश्वर चेवले ऋषिकेश बद्दे नागनाथ चलमले यांच्यासह अनेक जण होते
No comments:
Post a Comment