मुरूड प्रतिनिधी :- मुरुड येथील अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना वॉर्ड क्रमांक 6 नंबर मधील महिलांनी निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुरुड गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री व अवैध धंदे राजरोसपणे चालू आहेत ? गावामध्ये होणाऱ्या दारू विक्रीमुळे आम्हा महिलांना संसाराची, आमच्या मुला बाळाची हेळसांड होते, पती दररोज आमच्या बरोबर भांडण करून आम्हास मारहाण करत आहेत.
तसेच मुरुड मधील जनतेने वारंवार निवेदन देऊन ही अवैध धंदे चालूच आहेत .याबाबत आमच्या कडे तयार केलेले व्हिडीओ क्लिप्स असून आवश्यक असल्यास आम्ही आपल्याकडे सादर करण्यास तयार आहोत. लवकरात लवकर अवैध धंदे बंद करण्यात यावे अन्यथा कधीही उपोषणाला बसु असे निवेदनात म्हटले आहे.
माहितीस्तव पोलीस महानिरीक्षक कार्यालय नांदेड, पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर, जिल्हाअधिकारी कार्यालय, लातूर ,सरपंच व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय , मुरुड यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनावर विजयमाला जाधव, उषा माने ,सुशाला सुरवसे, शशिकला कटाळे, बेबी शेख ,सुलताना शेख ,उर्मिला कलपुरे ,जयश्री , अनिता, सायरा शेख, मंगल सगर, राधा गाडे, लक्ष्मीबाई मोरे, गंगुबाई गायकवाड , रेखा गायकवाड, किसनाबाई गायकवाड यांच्या स्वाक्षर्या आहेत.
No comments:
Post a Comment