मुंबई, दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण विनायक महामुनी यांची ‘नागरी सेवेतील महाराष्ट्र’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एअर’ या अॅपवर शनिवार, दि. २० नोव्हेंबर आणि सोमवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
यंदाच्या नागरी सेवा परीक्षेत विनायक महामुनी यांनी देशात ९५ वा क्रमांक प्राप्त केला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी कोचिंग क्लास हा यशस्वी होण्यासाठी किती फायदेशीर, अभ्यासासाठी पुस्तकांचा वापर, राज्यातच राहून परीक्षेची तयारी आणि परीक्षेसाठी इंग्रजी हा घटक, मुलाखतीची तयारी, मुलाखतीचा अनुभव आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. महामुनी यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3Fp3W5B
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment