मुंबई दि. 18 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सन 2019-20 आणि सन 2020-21 या वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील युवक-युवती आणि युवकांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांनी केले आहे. जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरीता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन 2019-20 व सन 2020-21 या दोन वर्षाकरिता 2 युवक, 2 युवती आणि 2 संस्था असे एकूण 6 पुरस्कार देण्यात येणार आहेत.
पुरस्कार पात्रांचे निकष खालीलप्रमाणे आहेत
(अ) युवक व युवती पुरस्कार –
(1) पुरस्कार वर्षाच्या 1 एप्रिल रोजी पुरस्कार्थीचे वय 13 वर्ष पूर्ण असावे तसेच 31 मार्च रोजी वय 35 वर्षाच्या आत असले पाहिजे.
(2) अर्जदार हा मुंबई शहर जिल्हात सलग 5 वर्षे वास्तव्यात असला पाहिजे.
(3) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृतपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफित व फोटो अर्जासोबत जोडावेत.
(4) केंद्र, राज्य, निमशासकिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक / कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
(ब) संस्था युवा पुरस्कार
(1) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था पुढील पाच वर्षे कार्यरत पाहिजे.
(2) संस्था सर्वजनिक विश्वास्त अधिनियम 1860 मुंबई किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अँक्ट १९५० अंतर्गत नोंदणीबद्ध असावी.
(3) गुणांकणाकरीता संस्थेने केलेल्या कार्याचे वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे,
चित्रफित व फोटो जोडावेत.
वरील प्रमाणे पुरस्काराकरीता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दि. 15 डिसेंबर 2021 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळुन कार्यालय वेळेमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, 2 रा मजला, धारावी बसडेपो जवळ, धारावी (प), मुंबई-400017 येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 8459585841 यावर संपर्क साधावा, असे मुंबई शहरचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3qO9KkR
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment