मुंबई, दि. 15 : थोर इतिहासकार, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिवंगत पुरंदरे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांची आराधना करण्यासाठी वाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांवर वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी केलेला अभ्यास, संशोधन, संदर्भ हे आपणासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘ जाणता राजा ‘ या महानाट्याच्या माध्यमातून महाराजांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वाचा वाटा दिला असून त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत.
0000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3HmTltH
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment