विधानसभा उपाध्यक्षांनी जितेश अंतापूरकर यांना दिली विधानसभा सदस्यत्वाची शपथ - latur saptrang

Breaking

Wednesday, November 10, 2021

विधानसभा उपाध्यक्षांनी जितेश अंतापूरकर यांना दिली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई, दि. 10 : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले जितेश अंतापूरकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली.

बुधवारी दुपारी विधानसभा उपाध्यक्ष श्री.झिरवाळ यांच्या दालनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार नाना पटोले, आमदार अमर राजूरकर, आमदार विक्रम काळे, विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांची उपस्थिती होती. यावेळी श्री. अंतापूरकर यांचे कुटुंबियही उपस्थित होते.

०००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3C649IG
https://ift.tt/3ofVheH

No comments:

Post a Comment