मुंबई, दि. 23 : सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली.
सायबर क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी हे सर्वासाठी मोठे आव्हान आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. सायबर गुन्हेगारी आणि फॉरेन्सिक सायन्स या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य मिळावे तसेच उभय देशातील संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत अशी अपेक्षा गृहमंत्री वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्र पोलिसांना पोलिसिंगसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहु असे वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्र्यांना यावेळी सांगितले.
पुढील आठवड्यात सिंगापूर विमानसेवा लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांसाठी सुरु होत आहे. यासाठीही मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळावे असे ही वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी सांगितले. तसेच सिंगापूर राज्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी, कम्युनिटी पोलिसिंग तसेच पोलिसांची कार्यपद्धती या बाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3nCHGyW
https://ift.tt/3qZgi08
No comments:
Post a Comment