वरुण गांधी 'तृणमूल'च्‍या वाटेवर? - latur saptrang

Breaking

Monday, November 22, 2021

वरुण गांधी 'तृणमूल'च्‍या वाटेवर?

 


नवी दिल्ली, :-

भाजप नेते आणि खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) पक्ष नेतृत्वावर नाराज होऊन पक्षाला सोडचिट्टी देण्याच्या मानसिकतेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वरुण गांधी हे तृणमूल काॅंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे. तृणमूल काॅंग्रेसच्या ममता बॅनर्जी या आजपासून दिल्लीच्या दौऱ्यावर तीन दिवस आहेत. त्यात वरुण गांधी आणि ममता बॅनर्जी यांची बैठकही होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

केंद्र सरकारच्या कॅबिनेट विस्तारामध्ये वरुण गांधी (Varun Gandhi) यांना संधी मिळाली नाही. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्येही त्‍यांच्‍या आई व भाजपच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍या  मेनका गांधी यांना स्‍थान मिळाले नाही. त्‍यामुळे दाेघेही नाराज आहेत, अशी चर्चा  राजकीय वर्तुळात हाेत आहे. आजपासून तृणमूल काॅंग्रेसच्या ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात वरुण गांधी हे ममता बॅनर्जी यांची भेट घेतील, अशी शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे.

२९ नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर आलेल्या आहेत. हा दौरा २२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर, असा तीन दिवसांचा आहे. या दौऱ्यात ममता बॅनर्जी अनेक नेत्यांचा भेटीगाठी घेणार आहेत.


हायवेवर पैशांनी भरलेल्या कंटेनरचा दरवाजा उघडला अन् नोटांचा पाऊसच पाऊस, लोकांनी अक्षरश: करोडो लुटल्याचा video व्हायरल
एसटी संप चिघळण्याची चिन्हे; धुळ्यात चार बसवर दगडफेक

No comments:

Post a Comment