उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भाऊबीजेच्या शुभेच्छा - latur saptrang

Breaking

Friday, November 5, 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भाऊबीजेच्या शुभेच्छा

भाऊबीज सणाच्या निमित्तानं माता-भगिनींना समाजात हक्क, मान-सन्मान, आदर मिळावा – उपमुख्यमंत्री 

मुंबई, दि. ५ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाऊबीजे निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री म्हणाले, “बहिण-भावाचं अतूट नातं अधिक घट्ट करणाऱ्या भाऊबीज सणाच्या सर्वांना शुभेच्छा. यंदाची दिवाळी व भाऊबीज सर्वांच्या घरात आनंद, चैतन्य, नवा उत्साह घेऊन घेईल. घरातलं, समाजातलं भाऊ-बहिणीचं नातं अधिक दृढ करेल. यंदाचा भाऊबीजेचा सण, माता-भगीनींना समाजात त्यांचा न्याय्य हक्क, मान-सन्मान, आदर मिळवून देणारा व त्यासाठी लढण्याचं बळ देणारा ठरो. राज्यातील समस्त बंधू-भगिनींना भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा….”

 



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3qctE90
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment