समीर वानखेडे पुन्हा दिल्लीत धडकले, अनुसूचित आयोगाकडे सादर केली कागदपत्रे, आयोग तक्रारींची चौकशी करणार - latur saptrang

Breaking

Monday, November 1, 2021

समीर वानखेडे पुन्हा दिल्लीत धडकले, अनुसूचित आयोगाकडे सादर केली कागदपत्रे, आयोग तक्रारींची चौकशी करणार



 नवी दिल्लीः नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे ( NCB ) चे मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे आज सकाळीच मुंबईहून दिल्लीत दाखल झाले. आज राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे ( NCSC ) अध्यक्ष विजय सांपला यांची भेट घेतली. वानखेडे यांनी आपली सर्व कागदपत्रे आयोगाला दिली आणि आपली तक्रारही नोंदवली आहे. आयोगाने जी काही तथ्ये आणि कागदपत्रे मागवली होती, ती आपण उपलब्ध करून दिली आहेत. आपल्या तक्रारीची पडताळणी करून लवकरच आयोगाचे अध्यक्ष त्यावर निर्णय देतील, असे वानखेडे म्हणाले

१९९५ च्या कास्ट सर्टिफिकेट आणि २००८ च्या कास्ट सर्टिफिकेटनुसार ते महार जातीचे आहेत. जन्म प्रमाणपत्रात पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाचा धर्म हिंदू लिहिलेला आहे. पहिले लग्नाचे डिसेंबर २००६ चे प्रमाणपत्र विशेष विवाह कायद्यांतर्गत आहे. घटस्फोटही एकमेकांच्या सहमतीने झाला असून तोही विशेष विवाह कायद्यांतर्गत झाला आहे. यानुसार पहिले प्रमाणपत्र १९९५ चे असून त्यात महार जात लिहिलेली आहे, असं वानखेडे यांनी आयोगाला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अनुसूचित जाती आयोगाच्या पूर्ण पीठाकडे वानखेडे यांनी आपली सर्व कागतपत्रे सादर केली. तसंच संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिकाही स्पष्ट केली, असं राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष रामनाथ यांनी सांगितलं. समीर वानखेडे यांचं म्हणणं ऐकल्यानंतर त्यांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी केली जाईल. त्यानंतर त्यांनी मांडलेली भूमिका लक्षात घेऊन आयोगाकडून निर्णय घेण्यात येईल, असं आयोगाचे सदस्य सुभाष रामनाथ म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांची रविवारी मुंबईत भेट घेतली. देश सेवेत असलेल्या समीर वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जातीची कुठलीही बनावट कागदपत्रे दिलेली नाहीत. आपण स्वतः त्यांचा जन्मदाखला पाहिला आहे. आणि वानखेडे यांचं म्हणणं सत्य असल्याचं आढळून आल्याचं अरुण हलदर म्हणाले.समीवर वनाखेडे यांच्यावर वैयक्तीक हल्ले करून काही नेत्यांकडून त्यांना बदनाम करण्याता प्रयत्न सुरू आहे. यामुळे अनुसूचित आयोग हे दलित कुटुंबाच्या हिताचे संरक्षण करेल, असं अरुण हलदर यांनी सांगितलं.


महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे यांनी जातीची बनावट कागदपत्रे सादर करून सरकार नोकरी मिळवली आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. नवाब मलिक यांनी २५ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेतली होती. समीर वानखेडेंनी नोकरी मिळवण्यासाठी धर्म बदलल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. या प्रकरणी समीर वानखेडे यांनी अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली होती.


शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याच्या सुसाइड नोटमध्ये मंत्र्याचं नाव?; भाजपची चौकशीची मागणी
आमच्‍या हातातही दगड आहे : संजय राऊत

No comments:

Post a Comment