शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याच्या सुसाइड नोटमध्ये मंत्र्याचं नाव?; भाजपची चौकशीची मागणी - latur saptrang

Breaking

Monday, November 1, 2021

शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याच्या सुसाइड नोटमध्ये मंत्र्याचं नाव?; भाजपची चौकशीची मागणी



 अहमदनगर:महाविकास आघाडी सरकारमधील जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्यावर भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) यांनी गंभीर आरोप केला आहे. गडाख यांच्याशी संबंधित मुळा एज्युकेशन संस्थेतील एका कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये त्या कर्मचाऱ्याने मंत्री गडाख आणि त्यांचे बंधू विजय गडाख यांची नावे घेतल्याने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मुरकुटे यांनी केली आहे.


वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुक्यातील नेते संजय लक्ष्‍मण सुखदान यांच्यावर मंत्री गडाख अन्याय करत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने सोमवारी नगरमध्ये आंदोलन केले. त्यामध्ये माजी आमदार मुरकुटे हेही सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या ‘वंचित’च्या नेत्यांनीही मंत्री गडाख यांच्यावर जोरदार टीका केली.



गडाख यांच्या मुळा एज्युकेशन सोसायटीमध्ये नोकरीला असलेल्या प्रतीक बाळासाहेब काळे (रा. नेवासा) या तरुण कर्मचाऱ्याने नुकतीच गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ तयार केला असून तो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्याने संस्थेतील वरिष्ठ अधिकारी आणि संस्थाचालक म्हणून गडाख कुटुंबातील काही सदस्यांची नावे घेतली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी संस्थेशी संबंधित सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यातील चौघांना अटकही झाली आहे. मात्र, यात गडाख कुटुंबीयांचा समावेश नाही.आता या प्रकरणात भाजपने उडी घेतली आहे. गडाख यांच्याविरोधात नगरमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनात माजी आमदार मुरकुटे यांनी याही प्रकरणाचा उल्लेख करून चौकशीची मागणी केली आहे. मुरकुटे यांनी म्हटले आहे की, काळे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांवर दबाव आहे. काळे यांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये जलसंधारण मंत्री गडाख, त्यांच्या पत्नी, तसेच भाऊ विजय गडाख यांचीही नावे घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणी गडाख यांची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री गडाख यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत नेवाशाचे माजी आमदार मुरकुटे यांनी गडाख कुटुंबावर अनेक आरोप केले. गडाख कुटुंबातील एका महिलेने गेल्या वर्षी आत्महत्या केली होती, त्याचाही उल्लेख करून मुरकुटे यांनी त्याचे पुढे काय झाले, असा सवाल उपस्थित केला.


नेवासा तालुक्यातील सुखदान यांना दिल्या जात असलेल्या त्रासाबद्दल हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सुखदान यांना गडाख यांच्याकडून त्रास होत असल्याचा निषेध करून पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. यासंबंधी गडाख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही आंदोलकांनी


आमच्‍या हातातही दगड आहे : संजय राऊत
आरोग्य विभागाच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडल्याची आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांची माहिती

No comments:

Post a Comment