क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारांमध्ये राज्याला विकासाच्या वाटेवर पुढे नेण्याची ताकद – उपमुख्यमंत्री अजित पवार - latur saptrang

Breaking

Saturday, November 27, 2021

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारांमध्ये राज्याला विकासाच्या वाटेवर पुढे नेण्याची ताकद – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 27 :- “सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. स्त्रीयांसाठी शिक्षणाची दारे खुली करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढून वैचारिक, सामाजिक क्रांती घडवली. राज्यकर्त्यांनी शेतकरी, बहुजन समाजाला केंद्रस्थानी ठेवून धोरणं आखली पाहिजेत हा विचार दिला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारांमध्ये राज्याला, देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे. त्यांच्या विचारांनी, दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा आपण निर्धार करुया,” अशा शब्दात उपमुख्यमत्री अजित पवार यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे स्मरण करुन त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले आहे.

०००००००००००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3cWmpua
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment