मुंबई, दि. 30 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना (GOIPMS-SC) साठी सन २०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता महाडिबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर दि १४ डिसेंबर २०२१ पासून प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याकरिता शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या नूतनीकरण (Renewal) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ०४ जानेवारी २०२२ आहे तर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या नवीन अर्ज (Fresh) ऑनलाईन सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०९ जानेवारी, २०२२ आहे. तरी मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी, सर्व प्राचार्य, कर्मचारी यांना शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरावेत, असे आवाहन मुंबई शहरचे सहायक आयुक्त, समाज कल्याण, यांनी केले आहे.
00000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3pD1283
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment