मुंबई, दि. 30 : राज्यात एकूण 12 विविध सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते. यापैकी “नृत्य” या कलाक्षेत्रातील पुरस्कार यावर्षापासून “आचार्य पार्वतीकुमार” यांचे नावाने देण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे .
००००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3qy75tT
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment