‘लोकराज्य’चा डिसेंबर-जानेवारीचा अंक प्रकाशित - latur saptrang

Breaking

Friday, December 31, 2021

‘लोकराज्य’चा डिसेंबर-जानेवारीचा अंक प्रकाशित

मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या डिसेंबर 2021 – जानेवारी 2022 चा ‘आपला महाराष्ट्र आपले सरकार- दोन वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची’ या जोड अंकाचे प्रकाशन नुकतेच झाले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर हे अंकाचे मुख्य संपादक आहेत.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाला दोन वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने या अंकात राज्य शासन जनसेवेसाठी राबवित असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला आहे. यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्रिमहोदयांनी आपल्या विभागातर्फे दोन वर्षात राबविलेल्या विविध योजना आणि लोककल्याणार्थ घेतलेल्या निवडक निर्णयांबाबत आपले मनोगत व्यक्त केले आहे. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण विशेष विभाग या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे. मंत्रिमंडळातील निर्णय आणि महत्त्वाच्या घडामोडी ही सदरे नेहमीप्रमाणे आहेत.

हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3pI9naJ
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment